राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून आता २२ वर्षे झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की हिंदुत्ववादी भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व या विचारधारेचा अनुयायी होण्यासाठी नियतीने माझीच निवड केली. देशहित व पक्षादेश शिरसावंद्य मानून जी कामगिरी सोपवली ती कर्तव्य कठोरपणे पूर्ण करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.
जनसंपर्कात राहून काम करणं….. विशेषतः समाजातील विविध लोकांशी सतत संपर्क ठेवून विशेषतः तरुण मुलं-मुलींशी संवाद साधत असताना त्यांचे वेगळे विचार, भन्नाट कल्पना आणि अत्यंत फ्रेश असा दृष्टिकोन पाहताना आपल्यातही एक ऊर्जा उत्पन्न होते. त्याचबरोबर जेष्ठांच्या पावलावर पाऊल टाकत जमिनीवर घट्ट पाय रोवून कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते. आपण जेव्हा समाजात वावरत असतो त्यावेळी मिळणारी अनुभव संपन्नता, ज्ञान आणि महत्वाचं म्हणजे लोकांचं प्रेम व त्यांचा विश्वास शब्दांत मांडू शकतच नाही.